

“समाजकार्यातून राष्ट्रप्रगती हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक समृद्धीच्या कार्यासाठी कायमच तत्पर असलेली छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक बहुउद्देशीय संस्था, संस्थेच्या नावात आणि कार्यात मोठी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक तत्त्वावर दुर्बल, वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करणारी ही संस्था आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन, आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध क्षेत्रांत संस्थेच काम आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, समतेचा, बंधुत्वाचा आणि विकासाचा मार्ग दाखवणारी ही संस्था आणि या संस्थेत कार्यरत असणारे सर्वच सदस्य समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून काम करत आहेत. संस्थेच्या पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी खुप साऱ्या सदिच्छा !

“ इवलीशे रोप लाविलीये द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी “ याप्रमाणे अल्पावधीत आपल्या कार्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्थेने सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. संस्थेच्या माध्यमातून आजतागायत विद्यार्थी, गरजू आणि अबालवृद्ध व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे.विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर, उन्हाळी शिबिरे राबविलेली आहेत. तसेच संस्थेने विविध शैक्षणिक साहित्यासह क्रीडा साहित्यांची मदत केली आहे. संस्थेचा समाजसेवेतून राष्ट्रनिर्मितीचा घेतलेला वसा हा अभूतपूर्व असाच आहे. संस्थारुपी हे तेजोमय रोपटे भविष्यात भले मोठे वटवृक्ष होणार यात तिळमात्र शंका नाही. असाच संस्थेच्या कार्याचा हा वेल कायम उंचच उंच बहरत जावो याच यानिमित्ताने शुभेच्छा..!

सामाजिक कार्यातून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करणे, तसेच गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे हा संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे. यासोबतच आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविणे, जसे की लहान मुलांचे लसीकरण, मधुमेह तपासणी व मोफत औषधोपचार, डोळ्यांची तपासणी व चष्म्यांचे वाटप इत्यादी संस्थेची उल्लेखनीय कामगिरी आहे. लवकरच गरीबांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. संस्थेचे सर्व कार्य देणगीदारांच्या मदतीवर चालत असून, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अतिशय उत्कृष्ट आणि समाजोपयोगी कार्य करत आहे. या कार्याला अधिक गती मिळण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. संस्थेच्या या उदात्त कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!

“नावात ताकद आणि कार्यात निष्ठा” या प्रेरणेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा खरा वारसा जपत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहे. समता, बंधुत्व आणि निस्वार्थ सेवेमुळे संस्था ‘लोकशक्ती’ उभी करत असून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि युवक मार्गदर्शनात उल्लेखनीय काम करत आहे. “समाजकार्यातून राष्ट्रप्रगती” हे ब्रीद त्यांनी कृतीत उतरवले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन उजळले आहे. ही सेवाभावी वाटचाल अशीच अविरत राहो, हीच सदिच्छा.
